Namo Shetkari Yojana 7th Installment Dae: शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहेत.
हप्त्याला उशीर का होत आहे?
नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतरच दिला जातो. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जमा होण्यास उशीर झाल्यामुळे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लांबला आहे.
- पीएम किसान हप्ता: पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे . हा हप्ता जमा झाल्यावरच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पुढील हप्त्याबद्दल सद्यस्थिती
सध्याच्या पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच, पुढील हप्ता वितरीत करण्यासाठी आवश्यक असलेला सरकारी निर्णय (GR) देखील निर्गमित करण्यात आलेला नाही. त्यामुळे, पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतरही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांमध्ये वाढलेली भीती
अधिवेशनात निधीची तरतूद नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे की, नमो शेतकरी योजनेसाठी असलेली ५,००० कोटी रुपयांची तरतूद कृषी समृद्धी योजनेकडे वळवली जाणार नाही ना. त्यामुळे, पुढील हप्ता कधी वितरित केला जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट सध्या उपलब्ध नाही. अधिकृत माहिती आल्यास तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल.