सरसकट महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रूपये मिळणार; अपात्र महिलांना आता पैसे मिळणार Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून २०२५ मध्ये सुमारे २६.३४ लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की, यातील पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल.

Ladki Bahin Yojana Update?

महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्या, ज्यामुळे या महिलांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये पुढील प्रमुख कारणे आहेत:

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
  • काही लाभार्थी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत.
  • काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता.
  • काही ठिकाणी पुरुषांनीही या योजनेसाठी अर्ज केले होते.
  • काही महिलांनी जन्मतारीख किंवा उत्पन्नाबाबत चुकीची माहिती सादर केली होती.

लाडक्या बहिणींचे पुढे काय होणार?

ज्या २६.३४ लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे, त्यांच्या माहितीची पडताळणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाईल. या पडताळणीनंतर ज्या महिला पात्र ठरतील, त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू केला जाईल.

दरम्यान, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate
सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate

या योजनेचा उद्देश गरजू आणि पात्र महिलांना मदत करणे हा आहे, त्यामुळे पडताळणीनंतर खऱ्या लाभार्थ्यांचा सन्माननिधी पुन्हा सुरू केला जाईल.

राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद
राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद

Leave a Comment