Kanda Anudan List : २०२३ मध्ये लाल कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आता १४,६६१ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे.
कांदा अनुदानाची माहिती
राज्य सरकारने १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजारपेठा आणि नाफेड केंद्रांवर विक्री केलेल्या लाल कांद्यासाठी प्रतिक्विंटल ३५० रुपये (जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत) अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला सातबारावरील नोंदींमुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने या प्रस्तावांची फेरछाननी करून आता हे अनुदान वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.
जिल्हानिहाय मंजूर अनुदान आणि शेतकरी संख्या पहा
राज्य सरकारने १० जिल्ह्यांतील १४,६६१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे.
जिल्हा | पात्र शेतकरी संख्या | मंजूर अनुदान (रुपये) |
नाशिक | ९,९८८ | १८,५८,७८,४९३ |
सातारा | २,००२ | ३,०३,८६,६०८ |
अहमदनगर | १,४०७ | २,८१,१२,९७९ |
जळगाव | ३८७ | १,६४,०७,९७६ |
पुणे (ग्रामीण) | २७७ | ७८,२४,३३० |
धाराशिव | २७२ | १,२०,९८,७०५ |
रायगड | २६१ | ६८,७६,०२६ |
धुळे | ४३ | ५७,०१,००९ |
सांगली | २२ | ८,०७,२७८ |
नागपूर | २ | २६,८०० |
या निर्णयामुळे या १० जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.