राज्यात ‘या’ भागात ‘एवढे दिवस’ मुसळधार पावसाचा इशारा; माणिकराव खुळे

शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे! मानिकराव खुळे (निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी पुणे) यांनी दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहेत. २० ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

मानिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः खालील भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहेत:

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
  • कोकण विभाग: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
  • मराठवाडा विभाग: बीड, लातूर आणि नांदेड.
  • विदर्भ विभाग: अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ.
  • घाटमाथ्यावरील तालुके: नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी आणि चांदगड तालुक्यांमध्ये दमदार पाऊस होईल.

या पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही ठिकाणी पूर येऊ शकतो. तसेच, धरणांच्या जलसाठ्यातही लक्षणीय वाढ अपेक्षित आहेत.

पावसासाठी अनुकूल हवामान स्थिती राहणार

राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक हवामान प्रणालींचा संगम. यात, मान्सूनचा आस त्याच्या नेहमीच्या ठिकाणाहून दक्षिणेकडे सरकला आहे. याव्यतिरिक्त, बंगालच्या उपसागरात दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ ७.६ किमी उंचीवर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच, अरबी समुद्रातही ३.१ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate
सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate

यासोबतच, ‘मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन’ (MJO) नावाची हवामान प्रणाली १४ ते २० ऑगस्ट दरम्यान भारतीय सागरी क्षेत्रातून मार्गक्रमण करत आहे. या प्रणालीमुळेच १४ ऑगस्टपासून राज्यात निष्क्रिय झालेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे, ज्यामुळे घाटमाथ्यासह सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. ही प्रणाली बंगालच्या उपसागरात १७-१८ ऑगस्टच्या सुमारास पोहोचल्यामुळे मान्सूनच्या शाखेला आणखी बळ मिळेल, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद
राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद

Leave a Comment