Farmer ID Card List: केंद्र सरकारच्या ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमांतर्गत आता शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) अर्थात ‘शेतकरी ओळखपत्र’ तयार केले जात आहे. हे एक डिजिटल ओळखपत्र आहे, जे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी संग्रहित करेल. यामुळे भविष्यात शेतीशी संबंधित कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करताना वारंवार कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.
फार्मर आयडीचे फायदे
- डिजिटल ओळख: शेतकऱ्यांची एक डिजिटल ओळख निर्माण होईल.
- माहिती संकलन: शेती आणि शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच आयडीमध्ये जमा होईल.
- अर्ज प्रक्रिया सोपी: सर्व माहिती एकत्रित असल्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करणे सोपे होईल.
- कागदपत्रांची बचत: प्रत्येक वेळी कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.
या शेतकऱ्यांना मिळेल फार्मर आयडी
- ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क आहे.
- जे शेतकरी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.
- ज्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
सध्या ‘फार्मर आयडी’साठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतील असा पर्याय पोर्टलवर दिलेला असला तरी, सध्या तरी ही नोंदणी सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन करावी लागेल.
नोंदणीसाठी:
- पोर्टलला भेट द्या: https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या अधिकृत पोर्टलवर जा.
- सीएससी द्वारे लॉग-इन: सध्या केवळ सीएससी आयडी असलेल्या व्यक्तीच लॉग-इन करू शकतात.
- माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
नोंदणी पूर्ण झाल्यावर, अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येते. हे कार्ड शेतकऱ्यांसाठी भविष्यात अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचे साधन ठरेल.