आनंदाचा शिधा योजना बंद; नवीन यादी जाहीर! Anandacha Shidha List

Anandacha Shidha List: राज्य सरकारचा एक मोठा निर्णय समोर आला आहे. राज्यातील सण-उत्सवादरम्यान स्वस्त दरात मिळणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेला आता कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वाढलेल्या आर्थिक ताणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नाही.

आनंदाचा शिधा योजना बंद: गणेशोत्सवात मिळणार नाही

१०० रुपयांत मिळायचा सणांचा गोडवा

गेल्या काही वर्षांपासून, गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमी यांसारख्या मोठ्या सणांच्या वेळी शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ मिळत होता. या पॅकेजमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

ही योजना कमी काळातच राज्यातील कोट्यवधी कुटुंबांसाठी एक मोठा आधार बनली होती. सणासुदीच्या काळात महागाईचा विचार करता, ही मदत सर्वसामान्यांसाठी खूप मोलाची ठरत होती. त्यामुळे, ही योजना बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम

‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्यामागे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आलेला आर्थिक ताण हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असल्यामुळे, इतर योजनांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचाच परिणाम ‘आनंदाचा शिधा’ योजनेवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

यामुळे आता आगामी गणेशोत्सवासाठी ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मिळणारा एक महत्त्वाचा आर्थिक आधार संपुष्टात आला आहे.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment