महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा Annapurna Yojana Free Cylinder

Gas Cylinder Free Annapurna Yojana: नमस्कार महिलांनो! महाराष्ट्रातीलच एमहिलांना घरखर्चाला हातभार लागावा आणि धुरकट चुलीमुळे होणारे आरोग्याचे प्रश्न कमी व्हावेत, यासाठी राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाची योजना आणलेली आहे. या योजनेनुसार, आता पात्र महिलांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ आहे.

या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे जीवनमान नक्कीच सुधारेल. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ म्हणजे काय?

  • ही योजना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे.
  • ही योजना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही लागू होणार आहे.
  • याअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातील.
  • सध्या या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाला आहे. येथे १५४० महिलांची यादी तयार झाली असून, लवकरच त्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप केले जाणार आहे.

या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत?

तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • तिचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • गॅस कनेक्शन महिलेच्या स्वतःच्या नावावर असावे.
  • बँक खाते आधार आणि मोबाईल नंबरशी जोडलेले असावे.
  • सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील:

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply
  • आधार कार्ड
  • गॅस कनेक्शन पासबुक (महिलेच्या नावावर)
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक

अर्ज प्रक्रिया

सध्या या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन कसा करायचा याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

या योजनेमुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कमी होतील आणि घरखर्चातही मोठी बचत होईल.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी लगेच कार्यवाही करा!

Leave a Comment