Annasaheb Patil Loan Apply: समाजातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना’ राबवली जात आहेत. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, तरुणांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जावरील व्याज महामंडळामार्फत भरले जाते, ज्यामुळे तरुणांवरील आर्थिक भार कमी होतो.
Annasaheb Patil Loan Apply
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत:
- उद्देश: बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे.
- व्याजमाफी: कर्जावरील व्याज महामंडळामार्फत दिले जाते.
- कर्जाची मर्यादा: १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
- व्याज परतावा: महामंडळ जास्तीत जास्त १२% द.सा.द.शे. व्याजदर भरेल आणि एकूण ₹३ लाख रुपयांपर्यंतच्या व्याज रकमेचा परतावा केला जाईल.
- वार्षिक उत्पन्न: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: पुरुषांसाठी कमाल ५० वर्षे आणि महिलांसाठी कमाल ५५ वर्षे.
- लाभाची अट: यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- जातीची अट: मराठा समाजासह, ज्या जातींसाठी दुसरे कोणतेही महामंडळ कार्यरत नाही, असे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
हे पण वाचा! पोस्ट ऑफिसची ‘ही’ खास योजना; 2 लाख रुपये देत आहे; असा अर्ज करा post office scheme
Process Annasaheb Patil Loan
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी महास्वयंम (Mahaswayam) वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
Annasaheb Patil Loan Documents
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (पुढील आणि मागील दोन्ही बाजू)
- रहिवासी पुरावा (उदा. वीज बिल, रेशन कार्ड)
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- प्रकल्प अहवाल (Project Report)
Annasaheb Patil Loan Intrest Calculator
अर्ज सादर केल्यानंतर, ७ दिवसांच्या आत अर्जाची स्थिती कळवली जाईल. व्यवसाय सुरू केल्यानंतर, ६ महिन्यांच्या आत त्याचे दोन फोटो वेबसाइटवर अपलोड करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे अनेक तरुणांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://udyog.mahaswayam.gov.in/ ला भेट देऊ शकता.