मोफत फवारणी पंपासाठी ऑनलाइन अर्ज सुरू; लगेच येथे अर्ज करा

शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाडीबीटी वेबसाइटवर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी (battery operated spray pump) ऑनलाइन अर्ज पुन्हा सुरू झाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नव्हते, परंतु आता तुम्ही सहज अर्ज करू शकता.

फवारणी पंप योजनेसाठी पात्रता आणि कागदपत्रे

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल. यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२ (सातबारा)
  • एकूण जमिनीचा दाखला

ऑनलाइन अर्ज कसा कराल? (स्टेप-बाय-स्टेप)

१. महाडीबीटीवर नोंदणी: सर्वप्रथम महाडीबीटीच्या शेतकरी पोर्टलवर जाऊन तुमची नोंदणी करा. २. लॉग इन करा: तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डने पोर्टलवर लॉग इन करा. ३. अर्ज सादर करा: ‘battery operated spray pump scheme’ या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करा. ४. शुल्क भरा: अर्ज सादर करताना तुम्हाला ₹२३.६० एवढे शुल्क भरावे लागेल. ५. पावती डाउनलोड करा: शुल्क भरल्यानंतर तुम्ही ‘मी अर्ज केलेल्या बाबी’ या विभागात जाऊन अर्जाची पावती डाउनलोड करू शकता.

अर्ज सादर केल्यानंतर कृषी अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतील. ही योजना लॉटरी पद्धतीने असल्यामुळे तुमचे नाव लॉटरीमध्ये आल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर संदेश येईल.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

Leave a Comment