Boarwell Anudan : महाराष्ट्र शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना आता बोअरवेल खोदण्यासाठी ५०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आहेत.
या योजनेतून केवळ बोअरवेलच नाही, तर नवीन विहिरी, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाईप्स आणि जुन्या विहिरींची दुरुस्ती यासाठीही १००% अनुदान मिळते आहे.
बोअरवेल अनुदान पात्रतेचे निकष काय?
बोअरवेल अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत:
- अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि अनुसूचित जमातीमधील असावा.
- शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
- जमिनीचा सातबारा आणि आठ-अ अर्जदाराच्याच नावावर असावा.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज मंजूर झाल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
- आधार कार्ड, जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला
- सातबारा आणि आठ-अ उतारा
- दारिद्र्यरेषेचे कार्ड (असल्यास)
- शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
- पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)
- ०.४० हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला
- शेतात विहीर नसल्याचा दाखला
- ५०० फूट अंतरावर दुसरी विहीर नसल्याचा दाखला (विहिरीसाठी)
- कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
- जागेचा फोटो आणि ग्रामसभेचा ठराव
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलला भेट देऊ शकता. तिथे ‘शेतकरी योजना’ या पर्यायावर क्लिक करून ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ निवडावी. अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी सहायक किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर संपर्क साधू शकता.