Crop Insurance List 2025: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध हंगामांतील पीकविमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. खरिप २०२२ पासूनची तसेच खरिप २०२४ आणि रब्बी हंगामातील सर्व थकित भरपाईची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
Crop Insurance List 2025
मागील काही वर्षांपासून पीक विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकरी सातत्याने आंदोलने करत होते. काही शेतकऱ्यांची खरिप २०२२ पासूनची भरपाई बाकी होती, तर काहींना काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित रक्कम मिळालेली नव्हती. आता सरकारकडून ही सर्व थकबाकीची रक्कम एकाच वेळी वितरीत केली जाणार आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहेत:
- खरिप २०२२ पासूनची थकित रक्कम
- खरिप २०२४ मधील वेगवेगळ्या ट्रिगरनुसार भरपाई
- रब्बी हंगामाची थकित रक्कम
राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा हप्ता आणि अनुदान वेळेवर दिलेले होते, मात्र कंपन्यांच्या विलंबामुळे शेतकरी नाराज होते. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल.