पिकविमा, अनुदान, नुकसान भरपाई कोणत्या बँक खात्यात जमा झाले, घरबसल्या असे चेक करा Crop Insurance Payment

Crop Insurance Payment Status: नमस्कार मित्रांनो! शासनाकडून मिळणारे , पीकविमा किंवा इतर कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहे, हे तपासण्यासाठी येथे एक सोपी आणि ऑनलाइन प्रक्रिया दिली आहे. तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून हे तपासू शकतात.

स्टेप 1: आधार कार्ड कोणत्या खात्याला जोडले आहे ते तपासा

कोणतेही सरकारी अनुदान थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे, सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!
  1. सर्वात आधी NPCI (National Payments Corporation of India) पोर्टलवर जा.
  2. येथे ‘Consumer’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर ‘Bharat Aadhaar Seeding Status’ निवडा.
  4. ‘Account Details’ वर क्लिक करा.
  5. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  6. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकून तुम्ही तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे, याची माहिती मिळवू शकता.

स्टेप 2: पेमेंट स्टेटस कसे तपासावे?

आधार कार्ड लिंक असलेल्या खात्याची माहिती मिळाल्यावर, तुम्ही पेमेंट स्टेटस तपासू शकता.

  1. PFMS (Public Financial Management System) पोर्टलवर जा.
  2. येथे ‘Know Your Payment’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमच्या बँकेचे नाव निवडा.
  4. तुमचा अकाउंट नंबर दोन वेळा टाका आणि कॅप्चा कोड भरा.
  5. पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो टाकून तुम्ही तुमच्या पेमेंटचे स्टेटस तपासू शकता.

यामध्ये तुम्हाला रेशनचे पैसे, पीक विम्याची रक्कम आणि इतर जमा झालेल्या अनुदानाची माहिती, जसे की तारीख आणि रक्कम, सविस्तरपणे पाहता येईल.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

या सोप्या ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिक त्यांच्या खात्यात जमा झालेले अनुदान सहज तपासू शकतात.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment