हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात; आले का? चेक करा Farmer Bonus Anudan List

Farmer Bonus Anudan List : २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा धान बोनस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी एकूण १८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद
राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद

अनुदान कोणाला मिळणार?

  • राज्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी, म्हणजेच ४० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो.

निधी जमा होण्यास विलंब का झाला?

बोनस वितरणात घोटाळा झाल्याच्या तक्रारींमुळे, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. या तपासणी प्रक्रियेमुळे निधी जमा होण्यास विलंब झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत प्रश्न विचारले होते आणि विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद राहणार school Holiday
पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद राहणार school Holiday

अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू

  • १७ ऑगस्ट २०२५ पासून या निधीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
  • पहिल्या टप्प्यात गोंदिया, भंडारा आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.
  • उर्वरित जिल्ह्यांतील रक्कम या जिल्ह्यांनंतर जमा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पेरणीच्या तोंडावर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना, निधी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

एरिन' चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा
‘एरिन’ चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा Cyclone Erin

Leave a Comment