सरकार शेतकऱ्यांसाठी 2 लाख विनातारण कर्ज देणार: येथे अर्ज करावा Farmer Loan Apply

Farmer Loan Apply : शेतीसाठी पैसे नसल्यामुळे अनेकदा आपल्यासमोर मोठी अडचण निर्माण होते. बँकेच्या नियमांमुळे विनातारण कर्ज मिळवणे अवघड होते, त्यामुळे अनेकदा खाजगी सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विनातारण कर्जाची मर्यादा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Farmer Loan Apply

विनातारण कर्जाची मर्यादा वाढली

गेल्या डिसेंबर २०२४ रोजी रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विनातारण कर्जाची मर्यादा ₹१.६० लाखांवरून ₹२ लाख करण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. २०१९ पासून या मर्यादेत कोणताही बदल झाला नव्हता.

हा निर्णय विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. यामुळे त्यांना पीक निविष्ठा खरेदीसाठी किंवा इतर खर्चांसाठी सहज कर्ज मिळेल आणि खाजगी सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यातून सुटका होईल.

एरिन' चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा
‘एरिन’ चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा Cyclone Erin

आता लाडक्या बहिणींना, सरकारचे आणखी एक नवीन गिफ्ट जाहीर! येथे पहा Ladki Bahin Yojana Gift

बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी

सरकारच्या धोरणानुसार, बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते. पण अनेकदा कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची खूप धावपळ होते. यामुळे अनेक शेतकरी बँकेत न जाता सरळ खाजगी सावकाराकडून कर्ज घेतात. खाजगी सावकारांचे व्याजदर खूप जास्त असल्याने शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबले जातात. त्यामुळे अनेक शेतकरी नैराश्यामुळे चुकीचे पाऊल उचलतात.

या अडचणी लक्षात घेऊन सरकारने बँकांना कमी कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या नवीन निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना कमी कष्टात जास्त कर्ज मिळू शकेल.

सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण; सोनं 50 हजार रुपये तोळा मिळणार Gold Rate
सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण; सोनं 50 हजार रुपये तोळा मिळणार Gold Rate

Farmer Loan Benifits

नवीन निर्णयाचे फायदे

  • आर्थिक दिलासा: शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या पैशाची अडचण भासणार नाही.
  • खाजगी सावकारांपासून सुटका: जास्त व्याजदराच्या कर्जातून सुटका मिळेल.
  • कमी कागदपत्रे: कमी कागदपत्रांमध्ये अधिक कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल.

या निर्णयामुळे शेतकरी अधिक सक्षम होतील आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

Farmer Loan Apply

लाडक्या बहिणींना ‘हि’ वस्तू मोफत मिळणार; सरकारची मोठी घोषणा Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींना ‘हि’ वस्तू मोफत मिळणार; सरकारची मोठी घोषणा Ladki Bahin Yojana

Leave a Comment