Gold Price : आज सोन्याचा भाव प्रति तोळा जवळपास १ लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहेत. त्यामुळे, सोने खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत, ५० वर्षांपूर्वीचे सोन्याचे दर कसे होते, हे जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एक जुने बिल पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
१९५९ सालचे व्हायरल बिल
सोशल मीडियावर १९५९ सालचे एक सोन्या-चांदीचे बिल व्हायरल झाले आहे. @Upscworldofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे बिल पोस्ट करण्यात आले आहे. या बिलानुसार, निंबाजी अष्टेकर नावाच्या एका दुकानदाराने शिवलिंग आत्माराम यांना दागिने विकले होते. या बिलावर एका तोळा सोन्याची किंमत फक्त ₹११३ नमूद केलेली आहे.
आजच्या सोन्याच्या दराशी (जवळपास ९७,००० रुपये प्रति तोळा) तुलना केल्यास ही किंमत अविश्वसनीय वाटते. त्यामुळेच हे बिल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, लोक ५० वर्षांच्या काळात सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सोने एक सुरक्षित गुंतवणूक
सोन्याला नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, आर्थिक अस्थिरता आणि इतर कारणांमुळे सोन्याच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत असतात. अलीकडेच भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू लागले आहेत.
१९५९ सालच्या बिलावर एकूण ₹९,९०९ चे सोने आणि चांदीचे दागिने खरेदी केल्याची नोंद आहे. तेव्हापासून आजपर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे त्या बिलावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. या व्हायरल बिलाने सोन्याच्या ऐतिहासिक किमतींबद्दलच्या चर्चांना जोरदार सुरुवात केली आहे.