Hero Splendor Electric: Hero Motocorp लवकरच आपली लोकप्रिय बाईक ‘Hero Splendor Plus’ इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आणण्याच्या तयारीमध्ये आहे. ही बाईक २०२७ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहेत. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार या नवीन इलेक्ट्रिक मॉडेलवर काम सुरू आहेत.
इलेक्ट्रिक व्हर्जनची तयारी
कंपनीच्या जयपूर येथील सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) मध्ये ‘Splendor Electric’ तयार करण्याचे काम सुरू आहे. हे कंपनीच्या मोठ्या इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा भाग आहे. या नवीन मॉडेलला ‘AEDA’ असे सांकेतिक नाव देण्यात आले असून, कंपनीची वार्षिक दोन लाख युनिट्स तयार करण्याची योजना आहे.
मुख्य वैशिष्ट्ये आणि अपेक्षा काय?
- उत्पादन: कंपनी २०२७ पर्यंत फक्त भारतीय बाजारासाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठीही इलेक्ट्रिक बाईक्स तयार करण्याची योजना आखत आहे.
- किंमत: ही बाईक ग्राहकांचे पहिले पसंतीचे वाहन बनू शकते, कारण Hero Splendor ने नेहमीच किमतीत परवडणारा पर्याय दिला आहे. त्यामुळे, इलेक्ट्रिक व्हर्जनची किंमतही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असण्याची शक्यता आहे.
- रेंज: इलेक्ट्रिक बाईक असल्यामुळे तिची रेंज (एका चार्जमध्ये कापले जाणारे अंतर) चांगली असण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून लांबच्या प्रवासासाठीही ती उपयुक्त ठरेल.
या बाईकच्या लाँचची अधिकृत घोषणा झाल्यावरच अधिक तपशील कळू शकतील. परंतु, Hero Motocorp च्या या उपक्रमामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.