खरीप 2025 हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती भाव मिळणार? Kharip MSP List 2025

केंद्र सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) म्हणजेच हमीभाव जाहीर केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य मोबदला मिळण्याची खात्री मिळाली आहे.

प्रमुख पिकांच्या हमीभावातील वाढ

या वर्षी अनेक महत्त्वाच्या पिकांच्या हमीभावात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे:

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
  • सोयाबीन: हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रुपयांची वाढ झाली असून, नवा दर ₹५,३२८ इतका आहे.
  • कापूस: मध्यम धाग्याच्या कापसासाठी ₹५८९ ची वाढ होऊन नवा दर ₹७,७१० झाला आहे, तर लांब धाग्याच्या कापसाला ₹८,११० चा दर मिळेल.
  • तूर: तुरीच्या हमीभावात ₹४५० ची वाढ झाली असून, आता तो ₹८,००० इतका असेल.
  • मका: मक्याच्या हमीभावात ₹१७५ ची वाढ झाली असून, तो आता ₹२,४०० झाला आहे.

पिकानुसार जाहीर झालेले हमीभाव (MSP)

खालील तक्त्यात खरीप २०२५ साठी जाहीर झालेले सर्व पिकांचे हमीभाव आणि त्यातील वाढ दिलेली आहे:

पीकप्रति क्विंटल हमीभाववाढ (रुपयांमध्ये)
सोयाबीन₹५,३२८₹४३६
कापूस (मध्यम)₹७,७१०₹५८९
कापूस (लांब)₹८,११०₹५८९
तूर₹८,०००₹४५०
मका₹२,४००₹१७५
ज्वारी (हायब्रीड)₹३,६९९₹३२८
ज्वारी (मालदांडी)₹३,७४९₹३२८
भात (सामान्य)₹२,३६९₹६९
भात (ए-ग्रेड)₹२,३८९₹६७
बाजरी₹२,७७५₹१५०
रागी₹४,८८६₹५९६
मूग₹८,७६८₹८६
उडीद₹७,८००₹४००
भुईमूग₹७,२६३₹४८०
सूर्यफूल₹७,७२१₹५७९
कारळे₹९,५३७₹८२०

ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख नक्की शेअर करावा.

सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate
सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate

Leave a Comment