Ladki Bahin August List : माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या हजारो महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणार आहे. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी काही सोप्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत.
योजनेबद्दल सविस्तर माहिती
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यात व पोषणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत दिली जाते. सुरुवातीला योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी जमा केला जाईल, असे सांगितले गेले होते. पण, आता सरकारने लवकरच म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी लाभाचे पहिले दोन हप्ते बँक खात्यात जमा करण्याची माहिती दिली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाइन यादी कशी तपासावी?
ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्या त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे ऑनलाइन तपासू शकतात. त्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा:
- ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाउनलोड करा: तुमच्या मोबाईलवर Google Play Store वरून ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाउनलोड करा.
- अर्ज उघडा: ॲपमध्ये विचारलेली सर्व माहिती भरून तुमचा अर्ज उघडा.
- योजना निवडा: मुख्य पानावर तुम्हाला ‘माझी लाडकी बहीण योजना’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यादी तपासा: त्यानंतर, ‘लाभार्थी यादी पाहा’ हा पर्याय निवडा. यावर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव यादीत तपासू शकता.
जर तुमचे नाव या यादीत असेल, तर लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.