‘लाडकी बहीण’ योजनेनंतर, आता महायुती सरकारने नोकरदार महिलांसाठी ‘पाळणा’ नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत, ही योजना ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणाघरे सुरू करणार आहे. यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांच्या संगोपनाची सुरक्षित आणि दर्जेदार सोय मिळणार आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- ठिकाणे: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार आहेत.
- सुविधा: या पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि लसीकरण यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
- आहार: मुलांना दिवसातून तीन वेळा नाश्ता आणि जेवण दिले जाईल.
- वेळा: पाळणाघरे महिन्यात २६ दिवस आणि दररोज ७.५ तास सुरू राहतील.
- कर्मचारी: प्रत्येक पाळणाघरात एक पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल.
- मानधन: पाळणा सेविकांना ₹५,५०० आणि पाळणा मदतनीसांना ₹३,००० प्रतिमाह मानधन दिले जाईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही अतिरिक्त भत्ता मिळणार आहे.
या घोषणेमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसोबतच नोकरदार महिलांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील आणि मानधन वाढवले जाईल, अशी घोषणा केली होती.
हे पण वाचा 👉 लाडक्या बहिणींना सरकारचे अजून एक मोठे गिफ्ट Ladki Bahin Yojana Gift