लाडकी बहिणी योजनेच्या अटी व नियमात बदल; नवीन नियम पहा Ladki Bahin Yojana

तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून, सध्या अर्ज आणि लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू आहे. या नवीन नियमांमुळे अनेक महिला योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

योजनेतील नवे नियम आणि अटी:

  • वयाची अट:
    • ‘नारी शक्ती दूत ॲप’ वरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी १ जुलै २०२४ रोजी वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
    • वेब पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी ३० सप्टेंबर २०२४ रोजी वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
  • जन्मतारखेची पडताळणी: आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरील जन्मतारीख एकसारखी असणे आवश्यक आहे. यात फरक आढळल्यास अर्ज रद्द होईल.
  • वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०२५ पर्यंत ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असेल, त्यांना योजनेतून वगळले जाईल.
  • कौटुंबिक मर्यादा:
    • एकाच रेशन कार्डवर फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते.
    • कुटुंबातील दोन विवाहित महिला (उदा. सासू-सून) किंवा दोन बहिणी अर्ज करत असल्यास, त्यापैकी फक्त एकच पात्र ठरेल.
  • रेशन कार्ड आणि रहिवासी नियम:
    • योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केल्यास जुने कार्डच ग्राह्य धरले जाईल.
    • परराज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या बदलांमुळे अनेक अपात्र महिला योजनेतून बाहेर पडू शकतात. तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुम्ही लाभार्थी असाल, तर तुमच्या अर्जाची स्थिती तपासणे आणि कागदपत्रे अद्ययावत आहेत की नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment