Ladki Bahin Yojana August Installment Date: राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत असतान. नुकताच जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर देण्यात आलेला. आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार, याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे. चला, या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार संभाव्य तारीख आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
ऑगस्टचा हप्ता कधी येणार?
लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार, दर महिन्याला याच वेळेत पैसे दिले जातात. त्यामुळे या महिन्यातही ₹१,५०० तुमच्या खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे.
गणेशोत्सवाच्या काळात हा हप्ता जमा होण्याची शक्यता जास्त आहे, कारण अनेकदा सणांचा मुहूर्त साधून लाभार्थ्यांना पैसे दिले जातात. लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल.
या महिलांना मिळणार नाहीत ₹१,५००
लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ४२ लाख महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. या महिलांना भविष्यात कधीही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी करून बाद केले जात आहेत. त्यामुळे अर्ज करताना सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.