एका घरात एकाच लाडक्या बहिणीला लाभ मिळणार; सरकारने घेतला मोठा निर्णय Ladki Bahin Yojana Hapta

Ladki Bahin Yojana Hapta : महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. आता एकाच घरातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. या नियमामुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहेत.

एका घरातून किती महिलांना लाभ मिळेल?

योजनेच्या नवीन नियमानुसार, एका घरातून दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सरकारने या नियमाच्या अंमलबजावणीसाठी तपासणी सुरू केली आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांकडून सर्वेक्षण केले जात असून, रेशन कार्डच्या आधारे एकाच घरातील लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जात आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये ८० हजारहून अधिक महिला एकाच घरातून तीन किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. तसेच, २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या २० हजारहून अधिक महिलांनाही याचा फटका बसणार आहे.

२६ लाख महिलांची चौकशी सुरू

महिला व बालकल्याण विभागाने एका घरातून दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्याच्या तब्बल २६ लाख महिलांची यादी तयार केली आहे. सध्या या सर्व महिलांची विभागानुसार गृह चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यावर, अतिरिक्त महिलांना योजनेतून वगळले जाईल. यामुळे योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

‘नियमित’ आणि ‘विशेष’ लाभार्थी

योजनेनुसार, सामान्य लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. मात्र, ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात, त्यांना या योजनेअंतर्गत ५०० रुपये दिले जातात.

हा बदल लागू झाल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असल्याचा अनुभव अंगणवाडी सेविकांना येत आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत निर्माण झाली आहे.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment