‘या ८ जिल्ह्यांत’ विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस; जिल्ह्यांची यादी पहा Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज, १२ ऑगस्ट रोजी दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही भागांत उन्हामुळे लोक हैराण झाली आहेत, पण आता पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे.

‘यलो अलर्ट’ जारी असलेले जिल्हे

खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे:

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!
  • पूर्व विदर्भ: यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली.
  • दक्षिण महाराष्ट्र: कोल्हापूर.
  • मराठवाडा: धाराशिव.

या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

इतर भागांतील हवामानाचा अंदाज

  • मुंबई आणि उपनगरे: साधारणपणे ढगाळ वातावरण असेल, पण काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • पुणे: पुणे शहरातही ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
  • उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांत साधारण ढगाळ वातावरण राहील.
  • कोकण: ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसतील.

नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

Leave a Comment