नमो शेतकरी योजनेचे वर्षाला आता 6,000 ऐवजी 9,000 रूपये मिळणार? आताची मोठी घोषणा! पहा

Namo Shetkari Yojana Hafta : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती, परंतु सध्या या घोषणेची अंमलबजावणी होण्यास काही अडचणी येत आहेत.

६ हजार ऐवजी ९ हजार मिळणार?

नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण ६,००० रुपये मिळतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रकमेत वाढ करून ती ९,००० रुपये वार्षिक करण्याची घोषणा केली होती.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

या वाढीव रकमेसाठी सरकारला अतिरिक्त ३,००० कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे” सरकारच्या तिजोरीवर वाढलेला ताण हे देखील यामागील एक कारण असू शकते, असे बोलले जात आहे.

सातव्या हप्त्यास विलंब आणि नवे नियम

राज्यातील ९३ लाखांहून अधिक शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी हा हप्ता वेळेत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र निधीच्या तरतुदीमुळे यात अडचण निर्माण झाली आहे.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

याचबरोबर या योजनेसाठी ‘ॲग्रीस्टॉक’ (Agristock) शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या धर्तीवर, राज्य सरकारही लवकरच नमो शेतकरी योजनेसाठी अशीच अधिसूचना जारी करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून ठेवावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

सध्या तरी, सातवा हप्ता लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, ₹९,००० ची वाढ कधीपासून लागू होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment