Namo Shetkari Yojana Hapta: ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, हप्ता कधी जमा होणार आणि त्याला उशीर का होत आहे? या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण येथे पाहू.
हप्ता जमा होण्यास उशीर का?
- ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतरच ‘नमो शेतकरी योजने’चा हप्ता दिला जातो. ‘पीएम किसान’ योजनेचा २० वा हप्ता वितरित होण्यास झालेला असल्यामुळे, ‘नमो शेतकरी योजने’चा हप्ताही लांबला आहे.
- सध्या मिळालेल्या माहितीनुसार, ‘पीएम किसान’ योजनेचा हप्ता विसावा हप्ता नुकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. त्यानंतरच ‘नमो शेतकरी योजने’च्या हप्त्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो.
अधिवेशनात निधीची तरतूद नाही
- अलीकडेच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाहीत.
- पुढील हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला जीआर (सरकारी निर्णय) देखील अद्याप निर्गमित झालेला नाही. यामुळे, ‘पीएम किसान’चा हप्ता मिळाल्यानंतरही ‘नमो शेतकरी योजने’चा हप्ता येण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व कारणांमुळे, ‘नमो शेतकरी योजने’चा पुढील हप्ता कधी वितरित होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट सध्या उपलब्ध नाही. मात्र, सरकारकडून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे.