तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असतान, तर थोडं थांबा. कारण, पुढील आठवड्यात भारतीय बाजारात दोन मोठ्या कंपन्यांचे नवे फोन्स येणार होत आहेत. पोको आणि ओप्पो कंपनीचे हे आगामी स्मार्टफोन त्यांच्या दमदार फीचर्समुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. हे सर्व फोन लाँच झाल्यानंतर फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
१) पोको एम७ प्लस ५जी (Poco M7 Plus 5G)
हा स्मार्टफोन १३ ऑगस्ट, २०२५ रोजी लाँच होणार आहे. या फोनमध्ये अनेक खास फीचर्स असतील:
- बॅटरी: ७००० एमएएच क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी, जी सिलिकॉन कार्बन तंत्रज्ञानामुळे इतक्या मोठ्या बॅटरी असूनही फोनला स्लिम डिझाइनमध्ये ठेवण्यास मदत करणार आहे.
- डिस्प्ले: ६.९ इंचाचा मोठा डिस्प्ले, जो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- इतर फीचर्स: रिव्हर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीचाही यात समावेश आहे.
- किंमत: कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन १५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो बजेट सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
२) ओप्पो के१३ सीरिज (Oppo K13 Series)
ओप्पोची ही नवी सीरिज ११ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२ वाजता बाजारात येणार आहे. या सीरिजमध्ये ओप्पो के१३ टर्बो (Oppo K13 Turbo) आणि के१३ टर्बो प्रो (K13 Turbo Pro) हे मॉडेल्स लाँच होण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये काही अत्याधुनिक फीचर्स असतील:
- प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन ८ एस जनरेशन ४ प्रोसेसर.
- बॅटरी आणि चार्जिंग: ७००० एमएएच बॅटरीसह ८० वॉटची फास्ट चार्जिंग सुविधा.
- कॅमेरा: ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लिअर कॅमेरा सिस्टम आणि एआय एडिटर २.०.
- डिस्प्ले: १.५ के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १६०० निट्स पीक ब्राइटनेस.
- इतर फीचर्स: यात ॲक्टिव्ह कूलिंग फॅन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे प्रगत फीचर्सही मिळतील.