पंचायत समिती सर्व योजना अर्ज सुरू: ‘या’ सर्व वस्तू मोफत मिळणार, येथे अर्ज करा Panchayat Samiti Yojana Apply

Panchayat Samiti Yojana Apply : महाराष्ट्र शासनाच्या पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि अपंग व्यक्तींना आर्थिक मदत, साहित्य आणि उपकरणे देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहेत. बऱ्याचदा या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे या लेखात आपण पंचायत समिती अंतर्गत उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत.

पंचायत समिती योजना: विभागानुसार थोडक्यात माहिती

पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आणि समाजकल्याण विभाग अशा विविध विभागांतर्गत योजना चालविल्या जातात.

एरिन' चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा
‘एरिन’ चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा Cyclone Erin
  • कृषी विभाग योजना:
    • ७५% अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच, कडबाकुट्टी यंत्र, प्लास्टिक क्रेट्स आणि ताडपत्री.
    • सिंचनासाठी पीव्हीसी (PVC) किंवा एचडीपीई (HDPE) पाईपसाठी ७५% अनुदान.
    • पीक संरक्षणासाठी औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांवर अनुदान.
  • पशुसंवर्धन विभाग योजना:
    • पशुपालकांना ७५% अनुदानावर कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार.
    • मिल्किंग मशिनसाठी ७५% अनुदान (जास्तीत जास्त १५,००० रुपयांपर्यंत).
    • कडकनाथ जातीच्या कोंबड्यांची ५० पिल्लांचा गट ७५% अनुदानावर.
    • ‘मैत्रीण योजना’ अंतर्गत महिलांना ५ शेळ्यांच्या गटासाठी ५० ते ७५% अनुदान.
  • महिला व बालकल्याण विभाग योजना:
    • ग्रामीण भागातील महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी ३,००० रुपयांचे अनुदान.
    • मोफत पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन पुरवणे.
    • इयत्ता ७ वी ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण.
    • एमएससीआयटी (MS-CIT) पूर्ण करणाऱ्या मुलींना ३,५०० रुपये लाभ थेट खात्यात जमा.

अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

पंचायत समितीच्या बहुतेक योजनांसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्थानिक पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:

  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • लाईट बिल
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शासकीय नोकरी नसल्याचे हमीपत्र

सध्या तुमच्या तालुक्यात कोणती योजना चालू आहे, याची माहिती घेण्यासाठी तुम्ही संबंधित पंचायत समिती कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता. या योजनांचा लाभ घेतल्यास तुम्हाला स्थानिक पातळीवरच अनेक शासकीय सुविधा उपलब्ध होतील.

सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण; सोनं 50 हजार रुपये तोळा मिळणार Gold Rate
सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण; सोनं 50 हजार रुपये तोळा मिळणार Gold Rate

Leave a Comment