शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नवीन आणि कठोर नियम लागू केलेले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
प्रमुख नियमांचे उल्लंघन आणि दंडाची रक्कम:
- हेल्मेट न घालणे: ₹१,००० दंड.
- नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे: पहिल्यांदा ₹५००, दुसऱ्यांदा ₹१,५०० दंड.
- वाहनाचा विमा नसणे: पहिल्यांदा ₹२,०००, दुसऱ्यांदा ₹४,००० दंड.
- मद्यप्राशन करून वाहन चालवणे: ₹१०,००० दंड, परवाना रद्द होणे किंवा तुरुंगवास.
- मोबाईलवर बोलून वाहन चालवणे: पहिल्यांदा ₹१,०००, दुसऱ्यांदा ₹१०,००० दंड.
- लायसन्स जवळ नसणे: ₹५०० ते ₹१,५०० दंड.
- लायसन्स नसणे: थेट ₹५,००० दंड.
- ट्रिपल सीट: ₹१,००० दंड.
- प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) नसणे: ₹५०० दंड.
- विरुद्ध दिशेने वाहन चालवणे: पहिल्यांदा ₹५००, दुसऱ्यांदा ₹१,५०० दंड.
- नो-एंट्री झोनमध्ये प्रवेश: ₹२,२५० दंड.
- धूळ झाकून न वाहणं (Construction Material): पहिल्यांदा ₹२,०००, दुसऱ्यांदा ₹५,००० दंड.
- विनापरमिट प्रवासी किंवा मालवाहतूक: ₹१०,००० दंड.
पोलिसांची मोहीम
वाहतूक शिस्त लागू करण्यासाठी, सोलापूर शहरात पोलिसांकडून मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर आठवड्यात ३ दिवस पायी गस्त आणि ३ दिवस नाकाबंदी केली जाईल. यादरम्यान, नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
या नियमांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.