7th Pay Commission: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहेत. येत्या काही दिवसांत या संदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहेत.
7th Pay Commission
महागाई भत्त्यातील मोठी ज्ञवाढ
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% इतका आहे, जो लवकरच तीन टक्क्यांनी वाढून ५८% होण्याची शक्यता आहे. याउलट, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही ५३% इतकाच आहे. आता राज्य सरकारही केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. ही वाढ दोन टक्क्यांनी होऊन ५३% वरून ५५% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
८ महिन्यांची थकबाकी मिळणार
ही महागाई भत्ता वाढ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. त्यामुळे, ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जानेवारीपासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम जमा केली जाईल. याचा अर्थ, कर्मचाऱ्यांना एकूण आठ महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ते या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून या संदर्भात लवकरच अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.