शेळी गट वाटप, गाय-म्हैस अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; लगेच येथे अर्ज करा

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत ‘नाविन्यपूर्ण योजना’ २०२५ अंतर्गत विविध व्यवसायांसाठी शासकीय अनुदानावर लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. यामध्ये दुधाळ गाई, म्हशी, शेळ्यांचे गट वाटप आणि कुक्कुटपालन अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

या योजनांचा उद्देश आणि प्राधान्यक्रम कसा?

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, अल्पभूधारक शेतकरी आणि महिला बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. या योजनेत खालील व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल:

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today
  • स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेले सुशिक्षित बेरोजगार युवक.
  • अल्पभूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर जमीन असलेले).
  • महिला बचत गट.
  • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी.

योजनेचे स्वरूप आणि अनुदान

या योजनेत लाभार्थींना त्यांच्या प्रवर्गाप्रमाणे अनुदान दिले जाईल.

  • दुधाळ गाई/म्हैशी: अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर त्यांना ५०% अनुदान मिळेल. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थींना ७५% अनुदान मिळेल.
    • संकरित गाईसाठी प्रति गाय ७०,००० रुपये (दोन गाईंसाठी १.४० लाख रुपये).
    • म्हशीसाठी प्रति म्हैस ८०,००० रुपये (दोन म्हशींसाठी १.६० लाख रुपये).
  • शेळी गट वाटप: या योजनेत १० शेळ्या आणि १ बोकड दिला जातो.
    • उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी ८,००० रुपये.
    • स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी प्रति शेळी ६,००० रुपये.
    • यामध्येही खुल्या प्रवर्गासाठी ५०% आणि अनुसूचित जाती/जमातींसाठी ७५% अनुदान मिळेल.
  • कुक्कुटपालन: १००० चौरस फुटांच्या शेडसाठी २ लाख रुपये आणि भांड्यांसाठी २५,००० रुपये असे एकूण २.२५ लाख रुपये अनुदान दिले जाईल. यामध्येही ५०% आणि ७५% अनुदान दिले जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी AH-MAHABMS या वेबसाइटवर किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. अर्ज करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही, फक्त तुमचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी लागेल.

सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate
सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (निवड झाल्यावर):
    • फोटो
    • जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८ अ
    • अपत्य दाखला
    • आधार कार्ड
    • जातीचा दाखला (लागू असल्यास)

तुमची निवड झाल्यावरच ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी २ जून, २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद
राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद

Leave a Comment