Heavy Rain Red Alert District List : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र राज्यात पूरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. मान्सून सक्रिय झाल्याने रत्नागिरी, नांदेड, हिंगोली आणि बुलढाणा जिल्ह्यांमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहेत. यामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
हवामान विभागाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे अतिवृष्टीचा धोका आहे.
याव्यतिरिक्त, मुंबई, पालघर, ठाणे, संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी ६० ते १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.