Mukhymantri Vayoshri Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी ₹३,००० ची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत त्यांच्या सुखसुईच्या आणि सुरळीत जीवनासाठी विविध उपकरणे खरेदी करण्याकरिता आहे.
योजनेचे प्रमुख तपशील:
- लाभार्थी: ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक.
- आर्थिक मदत: प्रतिवर्षी एकरकमी ₹३,०००.
- वितरण: ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या डीबीटी (DBT) संलग्न बँक खात्यात जमा होईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
- राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- स्वयंघोषणापत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया:

या योजनेसाठी सध्या ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज ऑनलाइन भरण्याची सोय अद्याप सुरू झालेली नाही.
- अर्ज डाउनलोड करा: तुम्हाला योजनेचा अर्ज संबंधित विभागाच्या वेबसाइटवरून किंवा जाहीर केलेल्या जीआर (GR) मधून डाउनलोड करावा लागेल.
- अर्ज भरा: अर्जाची प्रिंट काढून त्यात तुमची सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज जमा करा: भरलेला अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जमा करा.
तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्यास, लवकरच अर्ज करून या लाभाचा फायदा घ्या.