Tractor Anudan Yojana Apply : शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी आलेली आहे! कृषी यांत्रिकीकरण योजना/राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती उपयोगी अवजारांवर अनुदान दिले जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
योजनेचा उद्देश आणि अर्ज प्रक्रिया
आजच्या काळात शेतीची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असते. यामुळे, वेळेची बचत होते आणि काम लवकर होते. मात्र, ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्त खर्च लागतो, म्हणूनच शासन शेतकऱ्यांना या खर्चात मदत करत आहे.
- अर्ज कुठे कराल?
- इच्छुक शेतकरी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- तसेच, तुम्ही जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊनही अर्ज भरू शकता.
- अर्ज भरण्यासाठी आवश्यक: अर्जदार शेतकऱ्याकडे ‘फार्मर आयडी’ असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय अर्ज भरता येणार नाही.
अनुदान आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेत शेतकऱ्यांच्या प्रवर्गाप्रमाणे आणि ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार (BHP) अनुदान दिले जाते.
- अनुदान किती मिळेल?
- ८ ते २० BHP पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी: ७५,००० रुपये (सर्वसाधारण) ते १,००,००० रुपये (मागासवर्गीय/महिला/अल्पभूधारक).
- २० ते ४० BHP पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी: १,००,००० रुपये (सर्वसाधारण) ते १,२५,००० रुपये (मागासवर्गीय/महिला/अल्पभूधारक).
- ४० ते ७० BHP पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी: १,००,००० रुपये (सर्वसाधारण) ते १,२५,००० रुपये (मागासवर्गीय/महिला/अल्पभूधारक).
- आवश्यक कागदपत्रे:
- फार्मर आयडी
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ७/१२ उतारा (तुमच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
तुम्ही अर्ज भरल्यावर तुम्हाला मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी ही संधी सोडू नये.